मालवण /
कोरोना टाळेबंदीचा मोठा आर्थिक फटका पर्यटन , होम स्टे व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे या कालावधीतील पर्यटन व्यावसायिकांना वीज बिल माफी मिळावी तसेच टाळेबंदीनंतरच्या कालावधी नंतर पुढील सहा महिने वीज बिलांमध्ये शासनाने ५० टक्के सूट द्यावी. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता येत्या १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता टीटीडीएस पर्यटन संस्थेमार्फत वीज वितरण कंपनी मालवण कार्यालयात वीज बिल पताका आंदोलन छेडण्यात येणार आहे.तसेच ज्या पर्यटन व्यावसाईकांनि मागील लाईटबिल रक्कम जमा केली आहेत त्यांचि रक्कम पुढील बीलात जमा करावी हि मागणी करण्यात येणार आहे
जिल्हय़ातील पर्यटन व्यावसाईक नष्ट होण्याच्या अवस्थेत आहेत २०१९ दिवाळी मध्ये क्यार वादळ डिसेंबर मध्ये वादळ सदृश स्थिति व २०२०मध्ये कोरोना मुळे पर्यटन जिल्हय़ात पर्यटन व्यवसायात असलेल्या होम स्टे , हॉटेल लॉजिग , बोटींग,वाँँटर स्पोर्ट, स्कुबा डायव्हिंग, गाईड , टुरिस्ट व्हेईकल यांची आर्थिक स्थिति दननिय झाली असून या कठीण स्थितिमधून बाहेर पडणार कसे हा यक्ष प्रश्न या व्यावसाईकांना भेडसावत आहेत .स्थानीक व्यावसाईकांनि सरकारी मदत कींवा कुठलेही अनुदान न घेता आपले व्यवसाय उभे करून जिह्याचे पर्यटन शेत्रात नाव जगाच्या नकाशा वर कोरले आहे या सर्व विषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्यावसाईक आपल्या हॉटेल च्या बाहेर लाल झेंडा , लाल शाही मध्ये समस्या लिहुन पोस्टकार्ड आंदोलन करून पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व सरकारचे लक्ष वेधले आहे .या लाईट बील पताका आंदोलनाचा मुख्य उद्देश शासनाचा निषेध करण्याचा नसून पर्यटन, होमस्टे व्यावसाईक आर्थिक संकटात असून सरकारने या व्यावसाईकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सोबत यावे हा आहे .
जिल्ह्य़ातील व तालुक्यातील पर्यटन व होमस्टे, हॉटेल व्यावसाईकांनि या आंदोलनात भाग घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष संस्था अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी केले आहे.