मालवण /-

तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ६८ टक्के मतदान झाले आहे. ५४ जागांसाठीच्या उभ्या असलेल्या १०९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. येत्या १८ तारखेला तहसील कार्यालय येथे मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. अशी माहिती प्रभारी तहसीलदार सुधीर पाटील यांनी दिली.
मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री सर्व मतदान यंत्रे पोलिस बंदोबस्तात येथील तहसील कार्यालयात आणण्यात आली.
यात खरारे- पेंडूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान झाले. गोळवण-कुमामे-डिकवल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ७१.०४ टक्के मतदान झाले. कुणकवळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ६८.१० टक्के मतदान झाले. मसदे-चुनवरे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ७२.०२ टक्के मतदान झाले. चिंदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ६७.१४ टक्के मतदान झाले. आडवली-मालडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ७१.७३ टक्के मतदान झाले. एकूण ३३२१ स्त्री, ३३९५ पुरुष असे एकूण ६७१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
१८ जानेवारीला येथील तहसील कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सहा टेबल लावण्यात येणार आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीच्या प्रक्रियेस सुरवात होणार असून तासभरात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page