स्‍वच्‍छ कांदळवन अभियान अंतर्गत कांदळवन स्‍वच्‍छता मोहीम-

स्‍वच्‍छ कांदळवन अभियान अंतर्गत कांदळवन स्‍वच्‍छता मोहीम-

स्‍वच्‍छतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभल्यास वेंगुर्ला नगरपरिषद देशात प्रथम येईल : नगराध्यक्ष दिलीप गिरप –

वेंगुर्ला – वेंगुर्ले नगरपरिषद, जैवविविधता व उपजीविका तज्ञ कांदळवन प्रतिष्‍ठान, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज, रोटरी आणि रोट्रॅक्‍ट क्‍लब ऑफ मिडटाऊन,वेंगुर्ला आणि स्‍वामिनी बचत गट व स्‍थानिक मच्छिमार यांच्‍या सयुक्‍त विद्यमाने आज वेंगुर्ला शहरातील मांडवी भागात स्‍वच्‍छता मोहिम करण्‍यात आली. यामध्‍ये समुद्रातील भरतीच्‍या वेळी येणारे पाणी मांडवी खाडीत साचते. सदरच्‍या पाण्‍यामध्‍ये मोठया प्रमाणात समुद्रातील प्‍लॅस्टिक, थर्माकॉल, चप्‍पल, प्‍लॅस्टिक बॉटल्‍स, काचेच्‍या बॉटल्‍स या खाडीमधील वनस्‍पतीमध्‍ये येत असतात. सदरचा कचरा सर्व कर्मचारी आणि नागरीकांनी मिळून साफ केला.
सदरचा कचरा साफ करण्‍यासाठी बचत गटाला दिलेल्‍या अर्थसहाय्यामधून घेतलेल्‍या बोटीचा वापर करण्‍यात आला. यामध्‍ये बोटीतून अशा समुद्रातील पाणी साठलेल्‍या ठिकाणी प्रत्‍यक्ष जावून कचरा उचलण्‍यात आला. यामध्‍ये पाण्‍यातील कचरा उचलण्‍यासाठी विशेष प्रकारच्‍या मोठया चिमटयाचा वापर करण्‍यात आला. या चिमटयाच्‍या सहाय्याने कचरा पकडून तो बोटीमध्‍ये जमा करुन नगरपरिषदेच्‍या स्‍वच्‍छ भारत पर्यटन स्‍थळ येथे त्‍याची विशेष पध्‍दतीने विल्‍हेवाट लावण्‍यात आली.
सदरच्‍या कांदळवन स्‍वच्‍छता मोहिमेच्‍या वेळी न.प. नगराध्‍यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, मुख्‍याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, नगरसेवक प्रशांत आपटे,नगरसेविका साक्षी पेडणेकर व श्रेया मयेकर, दुर्गा ठिगळे जैवविविधता व उपजीविका तज्ञ कांदळवन प्रतिष्‍ठान, मालवण, जागृती गवंडे, प्रकल्‍प समन्‍वयक, कांदळवन, रोहित सावंत यूएन डीपी, बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजचे प्राध्‍यापक,रोटरी आणि रोट्रॅक्‍ट क्‍लब ऑफ मिडटाऊन वेंगुर्लाचे सदस्‍य, स्‍वामिनी बचत गटाच्‍या महिला श्‍वेता हुले आणि त्‍यांच्‍या सहकारी उपस्थित होत्‍या.
तसेच नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, निशा आळवे, प्रितम गायकवाड, वैभव म्‍हाकवेकर, पांडुरंग नाटेकर, जयेंद्र चौधरी, विलास ठुंबरे, विठ्ठल सोकटे, मंदार चौकेकर, स्‍वप्निल कोरगावकर, पंकज केळुसकर, सुधाकर राऊळ, दिपाली तांडेल, सुस्मित चव्‍हाण, पल्‍लवी धुरी, ज्‍योत्‍स्‍ना केळुसकर,कु. स्‍नेहा कुबल उपस्थित होते. तसेच सफाई कर्मचारी लक्ष्‍मण जाधव, अनिल वेंगुर्लेकर, संजय पवार, शरद कदम, कैलास वेंगुर्लेकर, किशोर गावडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
सदरच्‍या कांदळवन स्‍वच्‍छता मोहिमेसाठी ज्‍यांनी मदत केली त्‍याचे नगरपरिषदेच्‍या वतीने आभार मानण्‍यात आले आहेत. यापुढेही असेच सर्वानी स्‍वच्‍छतेसाठी मदत केल्‍यास वेंगुर्ला नगरपरिषदेचे नाव राज्‍यात नव्‍हे तर देशात देखील प्रथम क्रमांक प्राप्त करील, असा मला विश्‍वास आहे, असे मत नगराध्‍यक्ष दिलीप गिरप यांनी व्‍यक्‍त केले आहे.

अभिप्राय द्या..