गुरे चरवण्यासाठी गेलेल्या माणगाव येथील शेतकऱ्याला सर्पदंश.;अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल.

गुरे चरवण्यासाठी गेलेल्या माणगाव येथील शेतकऱ्याला सर्पदंश.;अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल.

कुडाळ /-

गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या वृद्धाला सर्प दंश झाल्याने ते अत्यवस्थ बनले.ही घटना आज दुपारी ०१ वाजण्याच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे घडली आहे.विष्णू शिवराम तेली (६५) रा.माणगाव ढोलकरवाडी, असे त्यांचे नाव आहे.दरम्यान सामाजिक कार्यकर्ते रुपेश पावसकर,रतिश साटम,सुशील चिंदरकर,कृष्णा तेली,नितीन सावंत यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आपल्या चार चाकीतून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तेली हे आपली गुरे चारण्यासाठी शेतात गेले होते.दरम्यान ते घरी परतत असताना वाटेत त्यांना घोणस जातीच्या सापाने दंश केला.यात ते अत्यवस्थ बनले.याबाबतची माहिती त्यांनी घरच्यांना दिली.दरम्यान त्या ठिकाणी आलेले श्री. पावसकर व त्यांचे सहकारी यांनी प्रसंगावधान राखत त्यांना तात्काळ आपल्या चारचाकीतून रुग्णालयात दाखल केले.यांच्यावर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत.

अभिप्राय द्या..