शिवप्रेमी संघटनेच्या वतीने जिजाऊ यांच्या जयंती दिनी कुडाळ जिजामाता चौकातील जिजाऊ यांच्या नूतन मूर्तीचे अनावरण..

शिवप्रेमी संघटनेच्या वतीने जिजाऊ यांच्या जयंती दिनी कुडाळ जिजामाता चौकातील जिजाऊ यांच्या नूतन मूर्तीचे अनावरण..

कुडाळ /-

कोरोना नियमांचे पालन करून आज कुडाळ शहरातील,शिवप्रेमींनी,शिवप्रेमी संघटनेच्या वतीने जिजाऊ यांच्या जयंती दिनी कुडाळ जिजामाता चौकातील जिजाऊ यांच्या नूतन मूर्तीचे आज १२ जानेवारीला अनावरण करण्यात आले.हे अनावरण
कुडाळ शहरातील प्रतिष्ठित नागरिक देवदत्त नाडकर्णी यांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमीं उपस्थित होते,तसेच सर्वच पक्षीय कार्यकर्ते या कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी उपस्थित रमाकांत नाडकर्णी ,स्मिता नाडकर्णी
दिपा नाडकर्णी ,इशांत नाडकर्णी,बनी नाडकर्णी, रमा नाईक,मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब,नगरसेवक गणेश भोगटे ,शिवप्रेमी रामा सावंत,विकास कुडाळकर, बनी नाडकर्णी, नगरसेवक एजाज नाईक,बाळा पावसकर, नगरसेविका साक्षी सावंत, दिप्ती पडते,ममता धुरी,भाजप जिल्हाध्यक्ष| संध्या तेरसे,नागेश नेमळेकर, सुंदर सावंत,अनिष सावंत,स्वरूप सावंत, चंदन कांबळी, प्रथमेश डिगसकर ओःकार मडवळ, लकी सावंत ,अक्षय सावंत ,लक्ष्मीकांत राणे ,ज्ञानेश्वर आळवे ,किरण कुडाळकर,प्रसाद शिरसाट मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थिती होते.कुडाळ येथील जिजामाता चौक येथे असलेली राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या नूतन प्रतिमेचे काम शिवप्रेमी सिंधुदुर्ग या संघटनेने काही महिन्यांपूर्वी हाती घेतले होते.हे काम आता पूर्णत्वास करून आज अनावरण करण्यात आले.यावेळी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिवप्रेमींचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

अभिप्राय द्या..