वेंगुर्ला /-
राजमाता जिजाऊ यांचे पुण्यस्मरण करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीचे कर्तव्य आहे.त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे,असे प्रतिपादन आज त्यांच्या जयंतीनिमित्त कृषिभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केले.यावेळी बोलताना विचारवंत एम.के.गावडे म्हणाले की,सोळाव्या शतकात महाराष्ट्रावर आदिलशाही व निजामशाहीचे साम्राज्य होते. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य नव्हते. आया-बहिणींचे चारित्र्य असुरक्षित होते. त्या काळातील वतनदार हे याच निजामशाही व आदिलशाहीच्या अंमलाखाली सरदारकी घेऊन धन्यता मानत होते. मात्र जिजाऊंना हे मान्य नव्हते. जिजाऊंनी लहानपणीच शस्त्र कला अवगत केली आणि त्याचा लढवय्या बाणा हा पुरुषांना सुद्धा लाजवणारा होता.शहाजीराजांशी विवाह झाल्यानंतर आदिलशाहीची सरदारकी कदापिही मान्य नव्हती. रयतेवर होणारा जुलूम त्यांना अस्वस्थ करत होता. मराठ्यांचे राज्य व्हावे, अशीच भावना होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर ती अधिकच तीव्र झाली. छत्रपतींना त्यांनी अगदी लहानपणापासूनच राज्यशास्त्र व युद्धकलेचे धडे देण्यास सुरुवात केली. राजमाता जिजाऊ या पौरुषत्वाचे ज्वलंत उदाहरण होते.जसजसे महाराज वयाने वाढत होते,तसतसे त्यांचे स्वतंत्र राज्याचे विचार प्रगल्भ होत होते.म्हणूनच त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रोहिडेश्वर मंदिरात स्वातंत्र्याची शपथ घेतली. खरं तर मराठ्यांचे राज्य व्हावे, हि राजमाता जिजाऊंची संकल्पना.त्यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले. एकेक मराठा सरदार गोळा केला. स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देत असतानाच ‘हर हर महादेव’ हे घोषवाक्यही दिले. राजमाता जिजाऊंनी तळागाळातील सामान्य, काबाडकष्ट करणाऱ्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांचे सहकारी बनविले. त्या इथेच थांबल्या नाहीत, तर अशिक्षित अडाणी महिलांना गोळा करून लढण्याची कला शिकविली.आपण अबला नाही तर सबला आहोत, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. त्याकाळात महिलांनी घरातील कर्त्या पुरुषाला पूर्णपणे साथ दिली. त्यामुळेच स्वातंत्र्य मिळवणे सोपे झाले.राजमाता जिजाऊंचे महाराष्ट्रावर अनंत उपकार आहेत. विखुरलेल्या समाजाला एकत्र करण्याचे काम त्यांनी केले.आपल्या सरदारकी मध्ये खुश असणाऱ्या सरदारांना आपले स्वतः चे राज्य असणे, हे पटवून दिले आणि म्हणून महाराष्ट्राच्या भौगोलिक आर्थिक उन्नतीच्या त्याच शिल्पकार होत्या, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया घातला.पण त्यापूर्वीही राजमाता जिजाऊंनी महिलांना जागृत करण्याचे काम केले. म्हणून आज सर्वच क्षेत्रात आज महिला भगिनी आघाडीवर दिसत आहेत.महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य व्हावे,ही “श्री” ची इच्छा राजमाता राजमाता जिजाऊंनी मांडली.त्यामुळे राजमाता जिजाऊंचे कार्य अतुलनीय आहे,असे एम.के.यांनी विचार व्यक्त केले.
वेंगुर्ला