तळवणे गावात सुरु असलेली कांदळ वनाची अवैद्य तोड तात्काळ थांबून संबंधितावर कारवाई

तळवणे गावात सुरु असलेली कांदळ वनाची अवैद्य तोड तात्काळ थांबून संबंधितावर कारवाई

सावंतवाडी /-

तळवणे गावात सुरु असलेली कांदळ वनाची अवैद्य तोड तात्काळ थांबून संबंधितावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज तेथील ग्रामस्थांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित सावंतवाडी वन विभागाला भेट देत चर्चा केली कांदळवन विभागाचे सिंधुदुर्गातील मुख्य कार्यालय मालवण येथे आहे त्यामुळे त्या ठिकाणी याबाबतची तक्रार करावी त्यानंतर संबंधित विभाग याची नक्कीच दखल घेईल असे सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी सांगितले.
यावेळी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर शहर अध्यक्ष अशिष सुभेदार आरोंदा कांदळवन समितीचे सदस्य गोकुळदास मोठे बाबुराव भोगले दिनेश भोगले आदी उपस्थित होते.
तळवणे गावात कांदळ वनाची अवैध तोड होत आहे मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप तेथील ग्रामस्थांनी तेथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी कांदळवन विभागाचे मुख्य कार्यालय मालवण येथे आहे त्यामुळे या मागणी संदर्भातील तक्रार अर्ज त्या ठिकाणी नेऊन द्यावा त्यानंतर संबंधित विभाग त्यावर नक्कीच करावी करेल असेच श्री जळगावकर यांनी सांगितले. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी ह्या विषयात कामचुकारपणा केला असेल त्यांच्यावर आपण कारवाई करू असे श्री जळगावकर म्हणाले

अभिप्राय द्या..