वेंगुर्ला /-

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायत येथे भेट दिली.यावेळी ग्रा.प.च्या वतीने शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी तीन निवेदने सादर केली आहेत.
पर्यटन विकासाच्या माध्यमातून शिरोडा वेळागर बीच चे शाश्वत रोजगाराच्या दृष्टीने नियोजन होणे बावत एक निवेदन देण्यात आले आहे.यामध्ये म्हटले आहे की
,आमच्या शिरोडा ग्रामपंचायत मध्ये वेळागरचा नितांत सुंदर असा बीच अंतर्भूत होतो. बेळागरची जागा ही एमटीडीसी कड़े असून ती यापुर्वाच महाराष्ट्र सरकारने पंचतारांकीत हॉटेलसाठी खाजगी कंपनीला करार स्वरूपात दिलेली आहे. यापुर्वी सदर करारामुळे तीव्र स्वरुपाची आंदोलने झाली असून स्थानिकांना पोलिसांकरवी मारहाणही झाली होती. सरकारने केलेल्या कराराबाबत स्थानिक जनतेमध्ये आजही संभ्रम व नाराजी आहे. निकोप पर्यटन वाढीसाठी स्थानिकांना विश्वासात घेण्याची गरज असते, पण शासनाकडून त्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही हे दुर्दैव आहे.आजची स्थीती पाहता, खाजगी होटेल गुप कंपनीला कराराने दिलेल्या त्या ५४ हेक्टर मध्ये येत असलेली जी समुद्र किना-यालगतची सुरुची बाग आहे हेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरले आहे. त्याभोवती बहरलेल्या पर्यटनातन अनेक सर्व सामान्य स्थानीक ग्रामस्थाना जीवनावश्यक रोजगार प्राप्त होत आहे. याकरिता पर्यटकांना आकर्षित करीत असलेली समुद्रकिनापट्टी लगतची ही किमान ४ एकर जागा आमच्या ताब्यात मिळावी अशी या ग्रामपंचायतची मागणी आहे, जेणेकरुन ग्रामर्पंचायत शिरोडा बीचबर पर्यटनासाठी येणा-या पर्यटकांना चांगल्या सोईसुविधा पुरवू शकेल. कार पाकीग प्रशिक्षीत बेरोजगारांना व महिला बचत गटाच्या महिलांना पर्यटन पुरक व्यवसासासाठी संधी निर्माण करणे, दुकान गाळे उपलब्ध करणे, बॉटरस्पोर्ट चालू करणे, ओपन जीम, टॉयलेट, बाथरुम, मुलांना खेळण्यासाठी उपयुक्त सुविधा, विविध स्पर्धा कार्यक्रमकांचे आयोजन करणे अशा प्रकारे सोई सुविधा उपलब्ध करुन देवू शकते. यामधून कर स्वरुपात ग्रामपंचायतीचे उत्पन्न तर वाढेलच, त्याचबरोबरीने स्थानिकांना हक्काच्या रोजगाराची संधी मिळू शकेल.
शाश्वत रोजगार व स्थानिकांना संधी या दष्टीने आवश्यक् असलेल्या या बाबींकडे आपण लक्ष दयावे. भविष्यात होणा-या प्रकल्पामुळे यादृष्टीने सुयोग्य नियोजन आपल्या ” व्हिजन ” मधून हे शक्य होईल,असे या निवेदनात म्हटले आहे.तसेच शिरोडा पंचक्रोशीमध्ये शिरोडा गांधीनगर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे स्मारक होणेबाबत प्रस्ताव मंजूरी बाबत निवेदन देण्यात आले आहे.
यामध्ये असे म्हटले आहे की,शिरोडा गांधीनगर ता.वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथील गट नं. ३७/१ क्षेत्र ०२.७२.०० हेक्टर आर शासकिय जमिन ७/१२ सदरी सॉल्ट डिपार्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट चे नावे दाखल आहे. सदर जमिनीपैकी ००.५०.०० हेक्टर आर जमिन ग्रामपंचायतीने नियोजित महात्मा गांधी स्मारकाचे बांधकाम करण्यासाठी हस्तांतरीत करुन मिळावी अशी मागणी केलेली आहे. त्याप्रमाणे सदर जमिन ग्रामपंचायत नावे हस्तांतरीत करणेस सॉल्ट डीपार्टमेंटने तयारी दर्शविली आहे. त्याचे पत्र या सोबत माहीतीसाठी सादर करीत आहोत. यास्तव त्यांची मागणी अशी की हा प्रस्ताव व ग्रामविकास विभागामार्फत सॉल्ट डीपार्टमेंट सेंट्रल गव्हरमेंट नवी दिल्ली यांचेकडे पाठविणेत यावा असे कळविलेले आहे. तरी त्याप्रमाणे नियोजित महात्मा गांधी स्मारक बांधणे बाबत प्रस्ताव मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांचे मार्फत ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. सदर प्रस्ताव मंजूर होणेबाबत अदयाप कोणतीही पुढील कार्यवाही झालेली नाही. तरी याबाबत आपले स्तरावरुन आवश्यक ती कार्यवाही व्हावी,असे निवेदन देण्यात आले आहे.केरळ कर्नाटकच्या धरतीवर मच्छीमार व्यवसाईकांसाठी पेट्रोलवर सबसीडी मिळणे बाबत निवेदन देण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्हयातील किनारपट्टीवरील मत्स्य व्यवसाय करणा-या मच्छीमार बांधवांसाठी केरळ/कर्नाटक या राज्यांमध्ये डिझेल व रॉकेलवर सबसीडी दिली जाते. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हयातील मच्छीमार बांधवांसाठी पेट्रोलवर सबसीडी उपलब्ध करुन दयावी,असे
निवेदनात म्हटले आहे.यावेळी शिरोडा ग्रा.प.सरपंच मनोज उगवेकर,भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई,जि. प. सदस्य प्रितेश राऊळ,
भाजपा वेंगुर्ले तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर ,बाबली वायंगणकर,दादा केळुस्कर, बाळ प्रभू ,शिरोडा उपसरपंच रवी पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी सुनील चव्हाण ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब,संजय फोडनाईक,दिलीप गावडे,तृप्ती परब,समृद्धी धानजी,प्राची नाईक, माजी सरपंच विजय पडवळ, बाबा नाईक,रेडी सरपंच रामसिंग राणे,भाजप पदाधिकारी लक्ष्मीकांत कर्पे,श्रीकृष्ण धानजी,सोमकांत सावंत , विद्याधर धानजी,संतोष अणसुरकर,बाबू राणे,महादेव नाईक,तातोबा कुडव,बबन आडारकर,शेखर गोडकर, नितीन तारी, दत्ताराम फटजी, गंधाली करमळकर,रीमा मेस्त्री,विद्या चिपकर आदींसह ग्राामस्थ,कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page