कुडाळ /-
कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्र शनिवारी सिल करण्यात आली.यावेळी कुपवडे ग्रामपंचायतीच्या एका पिवळ्या मतपत्रिके वरील उमेदवाराची निषाणी अस्पष्ट छापली गेली असल्याने याला भाजपाचे लोकप्रतिनिधी व कुपवडे माजी सरपंच दिलीप टवटे यांनी आक्षेप घेतला.मात्र तहसीलदार अमोल पाठक यांनी चिन्हांची पीडीएफ फाईल निवडणूक आयोगाकडून येत असल्याने यात आपल्याला स्थानिक स्तरावर कोणताच बदल करता येणार नसून याबाबत आपण निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी दिलेल्या सुचनानुसार योग्य ती कार्यवाही करू अशी ग्वाही दिली.
कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान यंत्रे उमेदवार व उमेदवार याचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सिल करण्यात आली. नऊ ग्रामपंचायतीमध्ये २७ केद्रांवर मतदान होणार आहे. या उमेदवारांची मतपत्रिका २७ मतदान यंत्रात सिल करण्यात आली.यावेळी कुपवडे ग्रामपंचायतीच्या एका पिवळ्या मतपत्रिका वरील उमेदवाराची निषाणीचे अस्पष्ट छापले गेले असल्याने याला भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक राणे व कुपवडे माजी सरपंच दिलीप टवटे यांनी याला आक्षेप घेतला. ग्रामीण भागात काही मतदार सुशिक्षित नसतात ग्रामीण भागात निषाणी बघून मतदान होत असते यात मतदारांची संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते याचा परिणाम मतदानावरही होऊ शकतो असे सांगत याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र तहसीलदार अमोल पाठक यांनी चिन्हांची पीडीएफ फाईल निवडणूक आयोगाकडून येत असल्याने यात आपल्याला स्थानिक स्तरावर कोणताच बदल करता येणार नसून याबाबत आपण निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी दिलेल्या सुचनानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.असे कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांनी सांगितले.