दोडामार्ग मध्ये साजरा करण्यात आला पत्रकार दिन दर्पणकारां सारखे परखडवादी व्हा.;तुळशीदास नाईक

दोडामार्ग मध्ये साजरा करण्यात आला पत्रकार दिन दर्पणकारां सारखे परखडवादी व्हा.;तुळशीदास नाईक

दोडामार्ग /-

दोडामार्ग मधील इलेक्ट्रॉनिक व प्रिंट पत्रकारांच्या वतीने डी एस एन चॅनल च्या कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक रत्नागिरी टाईम्स चे तालुका प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांनी आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या कार्य व आदर्श या गोष्टी नवोदित पत्रकारांसमोर मांडून परखड शैलीत विचार मांडण्याचे आवाहन केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार रत्नागिरी टाईम्स चे तालुका प्रतिनिधी तुळशीदास नाईक, दै सिंधुदुर्ग समाचार व ग्लोबल महाराष्ट्र चे सुमीत दळवी,लोकसंवाद लाईव्ह न्युजचे तालुका प्रतिनिधी प्रशांत गवस डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग न्यूज चे प्रमोद गवस, सिंधुदुर्ग माझा ब्रेकिंगचे गोविंद शिरसाट, अमित राणे, सुयश गवस आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..