मसुरे /-
सरत्या वर्षाचा शेवट चिंदर सेवा संघाने रक्तदान शिबिराचे आयोजन करत समाजासमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. २५ दात्यांनी रक्तदान केले. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष संदिप पारकर,उपाध्यक्ष विवेक परब, सचिव ओमकारगोलतकर,सहसचिव सचिन चिंदरकर, खजिनदार गणेश गोगटे, सल्लागार भाई तावडे, प्रकाश मेस्री, चंद्रशेखर पालकर, प्रसाद टोपले, मारुती हडकर, प्रथमेश तावडे, आशिष कोरगांवकर, नितीन गोलतकर, भूषण दत्तदास, सिध्देश गोलतकर यांनी सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष योगदान दिले.
यावेळी गोविंद गावकर, आशिष कोरगावकर, नितीन गोलतकर, गजानन पाटणकर,प्रणव राणे, सानिका मुळे,सर्वेश अपराज,सचिन चिंदरकर, दत्ताराम सावंत, निलेश गावकर, योगेश माळी, मकरंद केळकर, किशोर आचरेकर, दत्तात्रय गोसावी, विवेक घाटगे,उमेश मोहिते, रविकिरण गावडे,राजेश कांबळी,रोहन कोदे,शंकर पालकर,विश्वनाथ दळवी,भिकाजी साटम,सुमित कानविंदे, योगेश पाताडे, भूषण दत्तदास यांनी रक्तदान केले.सर्व रक्तदात्यांचे तसेचश्री.मकरंद केळकर आणि श्री.आत्माराम नाटेकर यांचे चिंदर सेवा संघातर्फे आभार मानण्यात आले.मान्यवरांचे स्वागत सचिव ओमकार गोलतकर यांनी केले, तर मान्यवरांचे आभार लोकसत्ताचे जेष्ठ पत्रकार श्री.आत्माराम नाटेकर यांनी मानले.