ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंदर येथे पोलीस संचलन

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंदर येथे पोलीस संचलन

आचरा /-
ग्रामपंचायत निवडणुकीच्या प|र्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि लोकांनी निर्भयतेने मतदान करावे यासाठी आचरा पोलीस स्टेशन हद्दितील चिंदर बाजारपेठ येथे पोलीस संचलन करण्यात आले तर आडवली तिठा येथे दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.

त्याकरिता आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या सह उपविभागीय पोलिस अधिकारी, कणकवली यांचेकडील एकअधिकारी , पोलीस ठाणे अंमलदार आठ ,आरसीपी चे 31 अंमलदार व होमगार्ड पाच इत्यादी सहभागी झालेले होते. पोलिस ठाणेकडील ढाल पाच , लाठी दहा , हेल्मेट दहा व पोलिस ठाणे वाहन, एक वज्र , व आरसी पी दोनवाहने इ. साहित्य वापरण्यात आले होते.

अभिप्राय द्या..