सावित्रीबाई फुले अलौकिक व्यक्तिमत्व!; सरपंच चंद्रकांत गोलतकर

सावित्रीबाई फुले अलौकिक व्यक्तिमत्व!; सरपंच चंद्रकांत गोलतकर

पळसंब मध्ये सावित्रीबाई फुले जयंती संपन्न

मसुरे /-

पळसंब मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. साहित्यिक कोमसाप मालवणच्या सौ. अनुराधा आचरेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
आज आपण ज्यांच्यामुळे मोकळा श्वास घेतोय त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस, या अलौकिक व्यक्तिमत्वाचे स्मरण करणे हे आपले आद्यकर्तव्य असल्याचे सरपंच चंद्रकांत गोलतकर यानी सांगितले.
शाळा पळसंब नं १ ने महिला शिक्षण दिनाचे आयोजन श्री .चिदरकर याच्या घरी केले होते. त्यावेळी पळसंब सरपंच चद्रकांत गोलतकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष श्री . रविकांत सावंत, मुख्याध्यापक सौ . असरोडकर , सौ . पवार , निकीता पुजारे , श्री.चिदरकर , सौ .शुभागी सांवत ,शिक्षक स्वयसेवक , मुले उपस्थित होते. पळसंब गावामध्ये पहिल्या महिला पोस्टमन म्हणून सेवा दिलेल्या निकिता पुजारे हिचा सत्कार करण्यात आला. अनुराधा आचरेकर (साहित्यिक कोम साप, मालवण) यानी आपल्या मालवणी कवीता सादर केल्या. तर बागवे मॅडम यानी सावित्रीबाई फुले याच्या विषयी मोलाच मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पवार मॅडम तर आभार असरोंडकर मॅडम यानी मानले.

अभिप्राय द्या..