कुडाळ /-
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दि-४ ते ९ जानेवारी २०२१रोजीपर्यंत गोळीबार सराव होत असल्याने नेहरुनगर (बाव) या फायरिंग बटच्या ठिकाणी मनुष्य, प्राणी वगैरे सदर मैदान व आजुबाजुच्या परिसरात जाऊ नये असे आवाहन कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी केले आहे. यादृष्टिने तीन दिवस गांवामध्ये सुरक्षितेच्या दृष्टिने सार्वजनिक ठिकाणी जाहिर प्रसिध्दी देवून सर्व ग्रामस्थांना गोळीबार सरावाबाबत अवगत करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे आदेशाप्रमाणे ४ जानेवारी रोजी पहाटेपासून ते दि- दि-८ जानेवारी रोजी सायंकाळ पर्यंत कुडाळ नेहरुनगर (बाव), फायरिंग बट भागात जाहिर दवंडी व प्रसिध्दी देवून सुरक्षिततेच्या दृष्टिने सतर्क राहण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. याअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नेमणुकीस पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा सन 2020 – 2021 चा वार्षिक गोळीबार सराव सुरु करण्यात येणार आहे. गोळीबार सराव सुरु असताना फायरिंग बटच्या ठिकाणी मनुष्य, प्राणी वगैरे सदर मैदान व आजुबाजुच्या परिसरात जानार नाहीत त्यादृष्टिने आज पासुन, तीन दिवस आपल्या गांवामध्ये सुरक्षितेच्या दृष्टिने योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.