कुडाळ तालुक्यातील बचतगटामधील २२ लाख रूपये अपहार प्रकरणातील तिसऱ्या महिलेला अटक.;तीन दिवसाची पोलीस कोठडी..

कुडाळ तालुक्यातील बचतगटामधील २२ लाख रूपये अपहार प्रकरणातील तिसऱ्या महिलेला अटक.;तीन दिवसाची पोलीस कोठडी..

कुडाळ /-

बचतगटामधील २२ लाख रूपये अपहार प्रकरणी तिसरी महिला प्रियांका पांडुरंग राऊळ राहणा शिवापूर हिला कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणातील तीनही महिलांना न्यायालयाने तिन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

जागृती प्रभाग संघ घावनळेच्या अध्यक्षा सौ समिधा सचिन घावनळकर, कोषाध्यक्षा कोमल कोरगावकर सचिव प्रियांका राऊळ व स्वरूप स्वयंसहायता संघ कारिवडेच्या अध्यक्षा सौ सेजल संजय कारिवडेकर, उपाध्यक्ष सौ प्राजक्ता प्रदीप नाईक, सचिव सौ सत्यवती प्रदिप नाईक यांच्यावर २२ लाख रूपये एवढ्या शासकीय निधीचा संगमताने अपहार केल्या प्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सौ सेजल संजय कारिवडेकर, सौ सत्यवती अनंत नाईक यांना शनिवारी दुपारी अटक केली होती तर यातील प्रियांका राऊळ या महिलेला सायंकाळी उशिरा अटक करण्यात आली.याप्रकरणी तीनही महिलांना कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अभिप्राय द्या..