सुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या फळप्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन..
वेंगुर्ला /-
सावित्रीबाई फुले जयंतीदिनी आसोली येथे फळप्रक्रिया प्रकल्प सुरू करून एक चांगला उपक्रम सुरू केला आहे.येथे फळप्रक्रिया उद्योगास खूप वाव असून महिला भगिनींनी असेच प्रक्रिया उद्योग सुरू करावेत.मार्केटिंगचा आम्ही विचार करू.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पुढे जायचे असेल तर महिलांनी सक्षम बनून आपले वेगळे स्थान निर्माण करावे व प्रतिष्ठा मिळवावी,असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला -आसोली येथे केले.
वेंगुर्ला तालुक्यातील सुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित वेंगुर्ला -आसोली घाडीवाडा येथील संस्थेच्या फळप्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष तथा वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे यांच्या हस्ते झाले.क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
जि.प.सदस्य – सिंधुदुर्ग विष्णुदास उर्फ दादा कुबल हे होते.यावेळी व्यासपीठावर
जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा परब,पं.स.सदस्य – माजी सभापती सुनिल मोरजकर,आसोली सरपंच रिया कुडव,मोचेमाड सरपंच स्वप्नेशा पालव,आसोली सोसायटी चेअरमन सदानंद गावडे,सहकारी अधिकारी आर.टी. चौगुले,अध्यक्ष सुजाता देसाई,उपाध्यक्ष भारती गावडे,सचिव प्रार्थना कांबळी ,मुख्याध्यापिका विशाखा वेंगुर्लेकर,साक्षी पाटकर आदी उपस्थित होते.
यावेळी एम.के.गावडे पुढे बोलताना म्हणाले की,उद्योजिका प्रज्ञा परब यांनी आज आपल्या कर्तृत्वाने आज जिल्ह्यात आदर्श नाव मिळविले आहे.सुर्यकांता महिला संस्था व विविध उद्योगामुळे आज महिला सबलीकरण झाले आहे.यांच्यासह सुजाता देसाई यांनी स्तुत्य उपक्रम राबविला आहे.आसोली गावावर आपले विशेष प्रेम असून सुरंगीबरोबरच अन्य फळे असून त्याला मोठे मार्केट आहे.नजिकच्या गावातील लोकांचे सहकार्य घेऊन प्रक्रिया उद्योग उभारा,असे एम.के.गावडे यांनी म्हणाले.यावेळी त्यांनी महात्मा फुले – सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व वाचून पुरस्कार प्राप्त करा,असे विशेष उल्लेख त्यांनी केला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दादा कुबल म्हणाले की,कोकणात चांगल्या प्रकारची फळे उपलब्ध असून त्यांचा योग्य उपयोग करून घेतल्यास महिला सबलीकरण होईल.महिलांनी सक्षम व्हावे,ही सावित्रीबाई यांची इच्छा येथील संस्थेने उद्योग सुरू करून केला आहे.एम.के.गावडे यांनी काथ्या सहकारी संस्था स्थापन केल्याने महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात असून त्याचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचे ते म्हणाले.
प्रज्ञा परब बोलताना म्हणाल्या की,आसोलित फळप्रक्रिया उदघाटन होतेय,ही सावित्रीबाई फुलेंना खरी आदरांजली होय.तालुक्यातही अन्य ठिकाणी असे प्रकल्प होणे आवश्यक आहे.घरची जबाबदारी सांभाळून महिलांनी असे उद्योग उभारण्यासाठी पुढे येऊन यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन केले.यावेळी आर.टी. चौगुले, सदानंद गावडे यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.सुजाता देसाई यांनी फळप्रक्रिया उद्योगाबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी आसोली ग्रामविकास मंडळ मुंबईचे सुरेश धुरी,विजय धुरी,मेघा गांगण,पडवे हॉस्पिटलच्या पडते,उद्योजक कर्पे,सौ.कर्पे,ग्रा.प.सदस्य रसिका कुडव,सुनिता रगजी, भारती जाधव,द्रौपदी मुळीक,पूजा साळगावकर,प्रविणा खानोलकर, श्रुती रेडकर,गीता परब,राखी करंगुटकर व अन्य ,वेतोरे ग्रा.प.
सदस्य यशश्री नाईक,भूषण आंगचेकर
कर,नितेश मयेकर आदींसह जिल्ह्यातील संस्थेच्या प्रतिनिधी, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक साक्षी पाटकर ,स्वागत व आभार सुजाता देसाई यांनी मानले.