वेंगुर्ला /-
वेंगुर्ला न.प.चे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी स्वच्छतेच्या बाबतीत चांगले काम केल्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमिताभ बच्चन यांच्या हस्ते बक्षिस मिळाले आहे.तसेच प्लॅस्टिकमुक्त शहर,हागंदारीमुक्त शहर बनविले होते.पर्यटन स्थळ विकसित करून संपूर्ण महाराष्ट्रात कचरामुक्त वेंगुर्ला पॅटर्न असे नावलौकिक झाले होते.तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत बक्षिस प्राप्त झाले होते.त्यानंतर कोकरेंची अन्यत्र बदली झाल्यानंतर वेंगुर्ले न.प.मुख्याधिकारी म्हणून वैभव साबळे यांची नियुक्ती झाली.ते रुजू झाल्यानंतर त्यांनी स्वच्छता निरीक्षक यांच्याकडून कंपोस्ट डेपोचा चार्ज काढून आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्याकडे सोपविला होता.त्यांच्या कारकिर्दीतील एफएसटीपीचे काम निकृष्ट झाले आहे.कंपोस्ट डेपो येथील दुर्गंधीबाबत शिवसेना पक्ष शिष्टमंडळाने नुकतीच पाहणी करून जाब विचारला आहे.साबळेंच्या कारकिर्दीत कंपोस्ट डेपोच्या उत्पन्नात घट झाली असून याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी सहकार्य करून नंबर मिळवून दिला होता.परंतु त्या बक्षीसरूपी रकमेचा उधळण करून भ्रष्टाचार केलेला आहे.हे स्थानिक आमदार दिपक केसरकर यांनी शासनाचे लक्ष वेधले.त्यामुळे साबळे यांची बदली झाली.वेंगुर्ला शहरातील नागरिकांनी शहर एवढे स्वच्छ ठेवलेले आहे,अशा शहराला स्वच्छतेच्या खाली दंड होणे ही नगरध्यक्ष व तत्कालीन मुख्याधिकारी वैभव साबळे यांची शोकांतिका आहे.कॉम्प्लेक्सचे पाणी नाल्यात जाऊन प्रदूषण होऊन डासांची उत्पत्ती होत आहे,याची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करावी.महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने सर्व्हे करून शहरात ड्रेनेज पासून व कंपोस्ट डेपोच्या दुर्गंधीपासून येथील नागरिकांची त्रासातून मुक्तता करावी,अशी मागणी करणार आहे,असे वेंगुर्ले नगरपरिषद माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संदेश निकम यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.