कुडाळ /-
तालुक्यातील आमदार वैभव नाईक यांच्या विकासकामांच्या झशपाट्या मुळे या नऊ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी त्या गावातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक काम करत आहेत.कुडाळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मुसंडीमारत तालुक्यातील ३ ग्रामपंचायतींवर सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याने कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने या तीनही सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले .
कुडाळ तालुक्यातील एकूण ०९ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने आपले उमेद्वार उभे केले असून त्यामध्ये माड़याचीवाडी,निळेली -गोठोस,पोखरण-कुसबे या तीन ग्रामपंचायतींवर अर्ज छानणींमध्ये आपले खाते उघडले यामध्ये माङयाचीवाडी ग्रामपंचायत मधील प्रभाग क्र. ३ मधील कांचना चंद्रकांत डिचोलकर ,निळेली -गोठोस ग्रामपंचायत मधील प्रभाग क्र . ३ मधील वैशाली साबा धुरी,पोखरण-कुसबे ग्रामपंचायत मढी प्रभाग क्र . १ विजय सोनू म्हाडेश्वर हे सदस्य बिनविरोध निवडून आले .यावेळी कुसबे गावातील सदानंद बापू जाधव ,समीक्षा सदानंद जाधव यांनी प्रवेश केला
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मा.श्री.सतीशजी सावंत ,जि .प.माजी अध्यक्ष विकासजी कुडाळकर,संजय गांधी निराधार योजनेने अध्यक्ष अतुल बंगे ,कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाठ ,उपतालुका प्रमुख महेश सावंत,आंब्रड विभाग प्रमुख विकास राऊळ,आबा मुंज,निळेली शाखाप्रमुख सागर धूमक ,कुडाळ ग्रामपंचायत माजी सदस्य नितीन सावंत,बाळा पावसकर ,पी.डी .सावंत ,कृष्णा तेली, बाबू तेली तसेच शिवसैनिक उपस्थित होते.