कुडाळ सांगीर्डेवाडीतील नळधारक अजूनही पाण्यापासून वंचित.;संजय भोगटे..

कुडाळ सांगीर्डेवाडीतील नळधारक अजूनही पाण्यापासून वंचित.;संजय भोगटे..

दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करू संजय भोगटे यांचा ईशारा..

दोन दिवसात कुडाळ सांगीर्डेवाडीतील नळधारक यांचा पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करू असा संजय भोगटे यांनी ईशारा दिला आहे.शिवसेनेच्या माध्यमातून संजय भोगटे सांगिर्डेवाडीतील त्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करताहेत आटोकाट प्रयत्न.

गेले बरेच महिने सांगिर्डेवाडीतील लोकांचा पाण्याचा लपंडाव चालू होता. पाणी कधी चालू तर कधी बंद.. तर काही वेळा टॅन्कर ने पाणी पुरवठा होत होता.तर काही दिवस तात्पुरती पाइप लाइन टाकून पाणी पुरवठा केला जायचा.टाकलेली तात्पुरती पाण्याची पाइप लाइन काढून टाकली त्यामुळे गेले दीड ते दोन महिने पाणी पुरवठा बंदच होता. त्यामुळे तेथील लोकांचे पाण्याविना हाल होत होते. नगरपंचायतने त्याकडे केले दुर्लक्ष. त्यामुळे तेथील ग्रामस्थ शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय भोगटे यांचेकडे आले त्यामुळे श्री. संजय भोगटे यांनी त्याठिकाणी जावून पाहणी केली असता.तेथील अडचण जाणून घेतली. तेथील रहिवासी श्री. वस्त यांच्या सहकार्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटण्यास सहकार्य लाभले.यावेळीं ग्रामस्थ प्रदीप राणे ,प्रथमेश राणे,अमित राणे,विजय परब,दिपक राणे ,बाळा राणे,.दशरथ राणे,.नाना राणे ,प्रमोद राणे,.सदाशिव राणे,महेश राणे ,वैभव परब,नंदकिशोर परब ,सुधीर परब ,प्रसाद चव्हाण,सुरेश चव्हाण ,विश्राम शिरसाट ग्रामस्थ उपस्थित होते.

कुडाळ शहरात गॅस पाइप लाइन टाकताना दोन तीन वेळा पाण्याची पाइप फोडली त्यावेळी नगरपंचायतच्या कर्मचार्‍यांकडून ती जोडून घेतली तर मग सांगिर्डेतील पाण्याची पाइपलाइन जोडून घ्यायला नगरपंचायत तत्परता का दाखवत नाही. (सदर काम हायवे ठेकेदार करत आहे.) नगरपंचायत ने फक्त सुपरविजन करावयाचे आहे. 15 फूट पाइप आणि 1वाल्ह जोडणी करणे बाकी आहे त्याकडे नगरपंचायत ने दुर्लक्ष केल्यामुळे सांगिर्डेवाडीतील नळधारक अजुनहि पाण्यामुळे वंचित राहिले आहेत. दोन दिवसात पाण्याचा प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन करू असा ईशारा देखील शिवसेनेचे संजय भोगटे यांनी दिला आहे.

अभिप्राय द्या..