वेंगुर्ला – तालुक्यातील निशाण तलावातील अस्तित्वातील पाणी साठा, तलावाचे चालू असलेले उंची वाढविण्याचे काम, हवामानातील बदल, सध्याचे तापमान व लोकांची पाण्याची वाढती मागणी याचा विचार करुन १ जानेवारीपासून शहरातील नळ कनेक्शनना नगरपरिषदेमार्फ होणारा पाणी पुरवठा २ दिवस आड करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व नळ कनेक्शन धारकांनी पाण्याचा जपून व योग्यप्रकारे वापर करावा व नगरपरिषदेस सहकार्य करावे. सदरचा पाणी पुरवठा १ जानेवारी होणार असून त्यानंतर ४ जानेवारी रोजी पाणी पुरवठा होईल. त्यानंतर दोन दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येईल. तरी सर्व नळ कनेक्शन धारकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे,असे नगरपरिषदेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

- Post author:Loksanvad News
- Post published:डिसेंबर 30, 2020
- Post category:इतर / बातम्या / वेंगुर्ले / सिंधुदुर्ग / स्थळ
- Post comments:0 Comments