वेंगुर्ला –
वेंगुर्लेचे माजी मुख्याधिकारी वैभव साबळे यांना बढती मिळून ते नगरविकास विभागाचे जिल्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्ती झाली आहे.या कार्यतत्पर अधिकाऱ्याचे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा नगर विकास विभागाचे जिल्हा प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झालेले वैभव साबळे यांचे महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल व वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ओरोस मुख्यालय नगर विकास विभागात ते पदभार स्विकारताना स्वागत व अभिनंदन केले.यावेळी वेंगुर्ले शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक नितीन कुबल, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, महिला शहर अध्यक्ष सुप्रिया परब, शहर पदाधिकारी भुपेंद्र कुबल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
