कुडाळमद्धे नऊ ग्रामपंचायतीसाठी एकूण २१३ अर्ज दाखल..

कुडाळ /-

आज कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या ७३ सदस्य जागांसाठी २१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्या गुरूवार दि.31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी प्रक्रीया होणार आहे.

कुडाळ तालुक्यातील ९ ग्रा.पं.ची निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. यासाठी अर्ज सादर करण्यात आले आहेत. यामध्ये गोठोस ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये ८ ,प्रभाग क्रमांक २ मध्ये ७, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५, वसोली ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये ५ ,प्रभाग क्रमांक २ मध्ये ७, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ४, गिरगांव कुसगांव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये ९,प्रभाग क्रमांक २ मध्ये ५, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५, कुपवडे ग्रा.पं मध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये २, प्रभाग क्रमांक २ मध्ये ३, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ४, पोखरण कुसबे ग्रा.पं.मध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये १, प्रभाग क्रमांक २ मध्ये ६, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ५, गोवेरी ग्रा.पं.मध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये १३, प्रभाग क्रमांक २ मध्ये ४, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ६, माड्याचीवाडी ग्रा.पं.मध्ये प्रभाग क्रमांक १ व २ मध्ये एकही अर्ज प्राप्त नाही. प्रभाग क्रमांक ३ मध्ये ७, आकेरी ग्रा.पं.मध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये ७, प्रभाग क्रमांक २ मध्ये ४, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ६, वाडोस ग्रा.पं.मध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये १०, प्रभाग क्रमांक २ मध्ये ९, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ९, अर्ज प्राप्त झाले आहेत. या ९ ग्रापमधील प्राप्त अर्जांची ३१ डिसेंबर रोजी छाननी होणार आहे. तर ४ जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. याचदिवशी चिन्ह वाटप होणार आहे. तर १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत निवडणूक होणार आहे. तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहीती कुडाळ तहसीलदार कार्यालय येथील निवडणुक विभागाकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page