पावशीतील भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्या प्रणाली फोडके व सौ.सुषमा तवटे,यांच्यासह अनेक महिला राष्ट्रवादीत दाखल..

पावशीतील भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्या प्रणाली फोडके व सौ.सुषमा तवटे,यांच्यासह अनेक महिला राष्ट्रवादीत दाखल..

कुडाळ /-

पावशी ग्रामपंचायतचे भाजपचे माजी ग्रामपंचायत सदस्य| प्रणाली फोडके व सौ.सुषमा तवटे यांच्यासह श्वेता कोंडके उर्मिला फोडके, सुषमा तवटे, वनिता वायगणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.हा प्रवेश जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि सचिव काका कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. पावशीतील हे दोन्ही ग्रुप आले त्या भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद अजिबात नव्हती आता त्याठिकाणी पक्षाला ताकद मिळेल, असा विश्वास असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सामंत यांनी सांगितले.यावेळी प्रवेश करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, जिल्हा सेल अध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..