कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे युवकांना आकर्षित करणारे नेतृत्व मानून कुडाळ येथील कट्टर नितेश राणे समर्थक प्रथमेश उर्फ मुन्ना प्रसाद दळवी यांच्यासह ४० युवकांनी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.एमआयडीसी वित्रामगहावर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, ओबीसी जिल्हा सेल अध्यक्ष बाळ कनयाळकर, युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या नेतृत्वाखालो प्रवेश केला.

काका कुडाळकर म्हणाले की, सर्वेश पावसकर आणि हितेश कुडाळकर यांनी यासाठीं फार मेहनत घेतली आहे. विकासाला चालना देणे, युवकाच्या हाताला काम देणे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कामकरत आहे. भविष्यात या जिल्ह्यात अमित सामंत, प्रफुल्ल सुद्रिक यांच्या नेतृत्वाखाली युवक संघटना काम करणार आहे असे काका कुडाळकर यांनी सांगितले.यावेळी भाजप कार्यकत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेमर्ये प्रवेश करणाच्यांचे स्वागत करताना अमित सामंत, काका कुडाळकर, प्रफुल्ल सुद्रीक, बाळ कनयाळकर ,सर्फराज नाईक आदी उपस्थित होते.

प्रवेशकत्यांमध्ये सौरभ सावंत, छोटू दळवी, सचिन सावंत, अभि राऊळ, रोहित शेटकर, अकित नाईक गौरव बठाकर, आकाश पिंगुळकर, तुपार शेळके, विक्रम गावडे, प्रवीण शेलटे सतीश सावंत, ओकार वालावलकर, रुपेश दळवी, राजू दळवी, शुभम गावडे, सचिन पावसकर, सागर परब, पावसकर मौरभ परब, रोहन कदम, संकेत पाटकर, मंदार परब, श्रीधर पवार, अंकुश साईल, विठोबा चव्हाण, प्रथमेश गावडे आदींचा समावेश होता.

दबावाला जगारून दळवी यांनी प्रवेश केला याबाबत आम्ही त्याचे पक्षात स्वागत करतो. आमचा पक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील. यावेळी संग्राम सावंत, जयराम नंदराज डीगसकर, सर्फराज नाईक, हितेश कुंडाळकर, ऍड मिता परब, संपदा तुळसकर, अशोक कांदे, मिलिंद घाटगे, श्री. नजीर आदी उपस्थित होते.सर्वांगीण विकासासाठीच राष्ट्रवादीत आपण प्रवेश केला असल्याचे सांगितले,यापूर्वी राणेसमर्थक म्हणून कार्यरत होतो. राष्ट्रवादीचे राष्ट्रीयअध्यक्ष शरद पवार है युवकांच्या सर्वांगीण विकासासाटी काहीतरी करू शकतात. त्यांचे काम चांगले आहे त्या कामाची दखल घेऊन आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत, असे प्रथमेश दळवी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page