कुडाळात चर्मकार समाजातर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव कार्यक्रम संपन्न..

कुडाळात चर्मकार समाजातर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /-

चर्मकार समाज उन्नती मंडळ राबवित असलेले उपक्रम स्तुत्य आहेत. समाजाचे संत रविदास भवन निर्मितीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. त्यासाठी सहकार्य करेन,असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्याच्या समाज उन्नती मंडळाच्या कार्यक्रमात केले.जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा दिनदर्शिका प्रकाशन, विद्यार्थी, समाज बांधवांचा गुणगौरव, समाजभूषण वितरण कार्यक्रम येथील सिद्धिविनायक हॉलमध्ये झाला. यावेळी आमदार नाईक, जिल्हा बैंक अध्यक्ष सतीश सावंत, सिंचन महामडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, खासदार विनायक राऊत यांच्या कन्या महिला उद्योजिक रुची राकत, मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, विकास कुडाळकर, नायब तहसीलदार प्रदीप पवार, उदय शिरोडकर, जिल्हा बैंक संचालक आत्माराम ओटवणेकर, मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश पवार,सुधाकर माणगावकर, लवू चव्हाण, नामदेव जाधव, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, येथील तालुकाच्यक्ष रामदास चव्हाण, सागर चव्हाण आदी उपस्थित होते.

श्री. जाधव म्हणाले, सर्वांनी सहकार्य केले तर दिलेली जबाबदारी निश्चित येल. यावेळी समाजात नवोदय विद्यालय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ताधारक, दहावी, बारावी, पदवी, विशेष पदवी प्राप्त विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. समाजातील विशेष पुरस्कार प्राप्त संस्थावर निवड झालेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. भजनी व दशावतारी कलावंताचा सन्मान करण्यात आला. समाजाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीला समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.यावेळी विजय चव्हाण, गणेश म्हापणकर, प्रकाश चव्हाण, मनोज सरमळकर, भास्कर पाताडे, हरेश चव्हाण, चंद्रकांत करजेकर, यशवंत भोसले, प्रक्षेप पवार, प्रशांत मिठबावकर, प्रकाश चव्हाण, अनंत कोळसुलकर, बावन केरकर यांना देऊन गौरवण्यात आले.

अभिप्राय द्या..