कुडाळ तालुक्यातील भडगाव ग्रामपंचायतचे काम उत्तम रित्या सुरु आहे.हि ग्रामपंचायतच शिवसेनेच्या ताब्यात आल्यानंतर गावात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून १ कोटीची विकास कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत. गेली २५ वर्षे रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे शिवसेनेवर नागरिकांचा वाढता विश्वास लक्षात घेऊन कुठेतरी भडगाव ग्रामपंचायतीला बदनाम करण्यासाठी रणजित देसाई यांचे प्रयत्न सुरु आहेत. भडगावचा होत असलेला विकास काही जणांच्या पचनी पडत नाही त्यामुळेच भडगावच्या विकास कामात अडथळा आणण्यासाठी रणजित देसाई यांनी जिल्हा परिषद मधील सत्तेचा गैरवापर करत ग्रा. प. च्या कामाची चौकशी लावण्यात आली. त्यासाठीची समितीही देसाईंच्याच मर्जीनुसार नेमली गेली मात्र या चौकशीत काहीच तथ्य नसल्याचे निष्पन्न झाल्याने आता त्या चौकशी समितीवर देसाई एकप्रकारे आरोप करत आहेत. म्हणजे यांचा जिल्हा परिषदेवर देखील विश्वास राहिला नाही हे दिसून येते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानेच रणजित देसाई सैरभर झाले आहेत त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे.त्यातूनच बिनबुडाचे ते आरोप करत सुटले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत अनेक विषय असताना केवळ भडगाव उपसरपंच यांचा विषय घेऊन सभा चालवावी लागते हे जिल्हा परिषद चे मोठे दुर्दैवच म्हणावे लागेल. अशी घणाघाती टीका भडगावचे उपसरपंच तुळशीदास (बाबी) गुरव यांनी केली आहे.

भडगाव गावापुरताच मर्यदित हा विषय नसून रणजित देसाई यांनी अनेक विरोधी ग्रामपंचायतची चौकशी लावून तेथील विकास कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयन्त केला आहे. तेथील सरपंच व सदस्यांना त्रास दिला जात आहे. लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करत आहेत. परंतु देसाईंच्या दुर्दैवाने त्यांना त्यात यश आले नाही. यामुळे त्यांचे मानसिक संतुलन आणखीनच बिघडत चालले आहे. वास्तविक रणजित देसाई हे जिल्हा परिषद सदस्य असल्याने भडगाव ग्रामपंचायतची चौकशी लावण्याअगोदर निविदा प्रक्रियेची रीतसर माहिती घेतली पाहिजे होती. भडगाव ग्रामपंचायतच्या चौकशीत काहीच तथ्य आढळले नसल्याने रणजित देसाई तोंडघशी पडले आहेत. त्यांनी आपले अज्ञान जिल्हा वासियांसमोर प्रकट केले आहे. यापुढे भडगाव ग्रा. प. वर आरोप करण्याअगोदर त्याची योग्य माहिती घेऊनच आरोप करावा. जिल्हा परिषदच्या चौकशी समितीवर रणजित देसाई यांनी दबावाखाली चौकशी केल्याचा आरोप करून जि प. मध्ये सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे.

राणे समर्थक भडगाव ग्रामपंचायतमध्ये सत्तेत असताना गावाच्या विकासास खीळ बसली होती.माझ्या भडगाव वासीयांनी राणे समर्थकांना नाकारून शिवसेनेवर विश्वास दाखवला. ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेची सत्ता आल्यानंतर भडगाव ब्राम्हणवाडी रस्ता, देऊळ वाडी रस्ता, भडगाव खुर्द स्मशानशेड, डिगाळवाडी रस्ता, टेंबवाडी रस्ता, नवीन अंगणवाडी इमारत, मधलीवाडी गणेशघाट, भडगाव खुर्द स्ट्रीटलाईट, गोरोबा मंदिर सुशोभीकरण व हायमास्ट, ब्राम्हणवाडी बंधारा, फटकूरवाडी बंधारा दुरुस्ती, चिऱ्याचा ओहोळ स्मशानशेड, ग्रामपंचायत विस्तारीकरण, गायरलवाडी रस्ता, भडगाव शाळेला प्रवेशद्वार, कॉजवे, शेतपाट, पाणी बंधारे, विहीर दुरुस्ती अशी अनेक १ कोटीची कामे शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. हि कामे प्रत्यक्षात पूर्ण झाली आहेत. त्यामुळे रणजित देसाई यांनी भडगावचा अगोदर अभ्यास करावा नंतरच आरोप करावेत.भडगावची चिंता करू नये त्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसैनिक खंबीर आहोत. स्वतःच्या मतदार संघात लक्ष देऊन लोकांचे प्रश्न सोडवावेत नको-त्या उठाठेवी देसाई यांनी करू नयेत. केवळ भडगाव येथील राहिलेल्या तुटपुंज्या कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी व राणेंच्या शाबासकीसाठी स्वतः घटनेची माहिती न घेता अशा प्रकारची नाहक बदनामी करणे एका जिल्हा परिषद सदस्यास शोभणीय नाही. विकास कामांमध्ये अडथळा आणण्या पलीकडे देसाई यांनी शाश्वत विकासाचे कोणते काम केले हेही दाखवून द्यावे. अशी टीका बाबी गुरव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page