खानोली विठ्ठल पंचायतनात उद्या दत्तजयंती उत्सव..

खानोली विठ्ठल पंचायतनात उद्या दत्तजयंती उत्सव..

वेंगुर्ला /-

खानोली येथील विठ्ठल पंचायतनात प्रतिवर्षाप्रमाणे दत्तजयंती उत्सव मंगळवार २९ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. त्या निमित्त सायंकाळी ७ वाजता नाईक-मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा आकर्षक दर्जेदार नाट्यप्रयोग होणार आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत दत्त नामस्मरण त्यानंतर आरती तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता दत्तजन्म समयी पुष्पवृष्टी पालखी प्रदक्षिणा असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल पंचायतनाचे व्यवस्थापक प. पु. दादा पंडित महाराज यांनी केले आहे

अभिप्राय द्या..