सिंधुदुर्ग /-
भाजप हा कधीही विकास प्रकल्पाच्या विरोधात नसून पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास होत असेल व रोजगार उपलब्ध होत असेल तर आम्ही अशा प्रकल्पाचे स्वागतच करु. विकासाच्या नावाखाली जर स्थानिक ग्रामस्थ किंवा भूमीपूत्रांवर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करु, असे आश्वासन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी वेळागर भूमिपूत्रांना
भूमिपूत्रांसोबत लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करु, असेही सांगितले.
वेळागर येथील ज्या भूमीपुत्रांच्या मालकीच्या जमिनी पर्यटन विकासाच्या नावाखाली पंचतारांकित हॉटेल कंपनीला देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून विद्यमान महाराष्ट्र सरकारने ९० वर्षांचा जो नवीन करार केला आहे. त्याबद्दल भूमीपुत्रांमध्ये पूर्ण नाराजीचे वातावरण आहे.
यासाठी राजन तेली यांनी आपल्या समस्या व सरकारने दुर्लक्षित केलेल्या मागण्या वरिष्ठ स्तरावर पोहचवून न्याय मिळावा यासाठी प्रत्यक्ष भेट देण्याची भावना व्यक्त केली होती. त्याप्रमाणे तेली यांनी वेळागर येथील लिंगेश्वर मंदिर येथे प्रत्यक्ष भेटून भूमीपुत्रांसोबत चर्चा केली. यावेळी शिरोडा वेळागर भूमिपुत्र संघाचे अध्यक्ष महादेव उर्फ भाई रेडकर, खजिनदार जगन्नाथ डोंगरे, समितीचे सदस्य राजू आंदुर्लेकर, विठ्ठल कांबळी यांनी सर्व्हे नं २९ ते ३६ तसेच सर्व्हे नं ३९ आणि २१२ व २१३ मधील मालकीच्या जागा ज्या शासनाने कराराप्रमाणे ५४ हेक्टरमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत याचा न्यायालयीन लढा चालू असल्याने त्या वगळून इतर शासनाच्या ताब्यातील जमिनीमध्ये पंचतारांकित हॉटेलच्या माध्यमातून पर्यटन विकास करावा हीच मागणी या पूर्वीही होती आणि या पुढेही राहणार आहे. शासनाने स्थानिक भूमीपुत्रांच्या मागण्यांचा योग्य विचार करुन यावर लवकर तोडगा काढावा व भूमिपुत्रांना न्याय द्यावा, अशी भूमिका मांडली व तसे निवेदन वेळागर भूमीपुत्र संघातर्फे राजन तेली यांना देण्यात आले.
वेळागर संघर्ष समितीचे अध्यक्ष आजू आमरे व समिती स