सिंधुदुर्ग /-

सिंधूदूर्ग जिल्हा बेलदार समाजाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले होते. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष राजन तेली , जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सदर धरणे आंदोलनाला पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवला तसेच बेलदार समाजाच्या या मागण्यांबाबत महासंघाचे अध्यक्ष श्री.एम.बी.जाधव वन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

बेलदार समाजातील लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यास येणाऱ्या अडचणी, विविध शासकीय समित्यांवर प्रतिनिधित्व, दारिद्र रेषे चा सर्वे या व अशा अनेक मागण्यांसाठी बेलदार समाज सिंधुदुर्ग जिल्हा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद गटनेते रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सावंत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक सुनील बांदेकर, संतोष वालावलकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच आजच्या या धरणे आंदोलनाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page