सिंधुदुर्ग जिल्हाग्रंथालय संघटनेने विविध विषयांवर पालकमंत्री उदय सामंत यांचे कुडाळ येथे निवेदनाद्वारे वेधले लक्ष

सिंधुदुर्ग जिल्हाग्रंथालय संघटनेने विविध विषयांवर पालकमंत्री उदय सामंत यांचे कुडाळ येथे निवेदनाद्वारे वेधले लक्ष

पालकमंत्री सिंधुदुर्ग तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उदयजी सामंत यांना कुडाळ येथे भेट घेत ,सिंधुदुर्ग जिल्हाग्रंथालय संघ यांनी निवेदनाद्वारे,सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानाबाबत निवेदन देऊन पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्र शासन आर्थिक संकटाशी झुंजत असतानाही आपण लक्ष घालून महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानाच्या पहिल्या हप्या पैकी २५% अनुदान मंजूर करून ते वितरीत करण्याच्या सूचनाही मा. ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना दिल्यात त्यासाठी आपले मनापासून आभार ! आदरणीय महोदय महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांच्या वार्षिक अनुदानासाठी निव्वळ १२३ कोटी रुपयांची तरतूद करावी लागते.त्यात महाराष्ट्र शासन सार्वजनिक ग्रंथालयांना हे अनुदान परिरक्षण अनुदान ” म्हणून देत असते. सार्वजनिक ग्रंथालयांच्या एकूण खर्चापैकी खर्चाचा काहीभाग महाराष्ट्र शासन उचलते. इतर विभागाच्या खर्चाची तुलना करता हा खर्च नगण्य म्हणता येईल. वास्तक्कि महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक ग्रंथालयांना आणखी काही सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे किंवा सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करून अभ्यासक, सभासद आणि रसिकांना आणखी सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना प्रेरित करायला हवे. आम्हाला नमूद करायला अभिमान आणि खेद दोन्ही होत आहे. सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व जाणून त्यांच्या प्रश्नाकडे, समस्यांकडे विशेष गांभीर्याने पहिले नाही म्हणून आम्हा सर्व ग्रंथालय कार्यकर्त्यांना आपणाकडून विशेष अपेक्षा आहे.

१. सार्वजनिक ग्रंथालयांबाबतचे सर्वकष धोरण आपण विधान भवनात मांडून मंजूर करून घेणार आहात ते कृपया मंजूर करून घ्यावे.

२. राज्य ग्रंथालय परिषदेची पुनर्रचना आपण सुरु केली होती ती पूर्णत्वास न्यावी.
३. सार्वजनिक ग्रंथालय सेवकांचे वेतन दरमहा त्यांच्या खात्यात जगा होईल ( Online Payment) असा निर्णय कृपया घ्यावा.

४. सार्वजनिक ग्रंथालयांसाठी फक्त १२३ कोटी रुपयांची बार्षिक तरतूद आपणास करावी लागते. त्यात कोणत्याही कारणास्तव कपात होणार नाही. याकडे आपण कृपया लक्ष द्यावे आणि सार्वजनिक ग्रंथालयांना परिरक्षण अनुदान १००% मिळेल असे कृपया पाहावे.

कोरोना प्रादुर्भावाने सार्वजनिक ग्रंथालयांच्या सेवांवर आणि खर्चावरही परिणाम झाला आहे. म्हणून आपणास प्रार्थनावजा विनंती की, सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना आणि मान्यताप्राप्त जिल्हा, विभाग, राज्य ग्रंथालय संघाना पुढील वर्षी देण्यात येणाऱ्या परिरक्षण अनुदानाला खर्चाची मर्यादा शिथिल करावी.आपण महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळी बद्दल ग्रंथालय सेवेबद्दल अत्यंत संवेदनशील आहात म्हणूनच आपल्याला निवेदन देत आणि विनंती केली आहे.अशी सिंधुदुर्ग जिल्हाग्रंथालय संघ यांच्या वतीने कुडाळ येथे पालकमंत्री उदय सामंत यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..