मसुरे /-

मसुरे देऊळवाडा विकासवाडी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.उदघाटन सरपंच सौ आदिती अमोल मेस्त्री यानी केले. यावेळी उपसरपंच नरेंद्र सावंत, कृषी अधिकारी निलेश उगवेकर, सौ एकता एकनाथ बागवे आदि उपस्थित होते. कृषी अधिकारीॅ निलेश उगवेकर यानी आधुनिक तंत्राची शेती तसेच फायद्याची शेती या बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे मिरी लागवड तंत्र, परसबागेतील कुकुटपालन, बचतगट माध्यमातून करता येणारे जोड उद्योग याबाबत उपयुक्त माहिती दिली. सध्याच्या काळात शेती करणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे जे विकेल तेच पिकवा असे आवाहन त्यानी शेतकऱ्यांना केले. यावेळी सरपंच सौ मेस्त्री यानी कार्यक्रमास शुभेच्छा देताना शेतकऱ्यानी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. प्रस्तावीक एकनाथ बागवे तर आभार एकता बागवे यानी मानले. यावेळी संतोष दुखंडे, एकनाथ परब, अत्रिनंदन परब, एकनाथ बागवे, प्रमोद भोगले, तायाजी बागव, संजय राणे, अजय बागवे, दशरथ बागवे, सौ फोलोमीनी लोबो, सौ धनलक्ष्मी दुखंडे, सौ किर्ती परब आदि सुमारे साठ शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page