दिल्ली /-

नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातले शेतकरी रस्त्यावर उतरले असताना, दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. स्वत:च्या राजकीय लाभासाठी विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. तर, 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपयेही ट्रान्सफर करण्यात आले आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.

यानंतर मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या मनोज नावाच्या शेतकऱ्यानं नव्या कृषी कायद्यांमुळे फायदा झाल्याचं सांगितलं. नव्या कायद्यांमुळे नवे पर्याय उपलब्ध झाले. आधी आमच्याकडे बाजारात जाऊन शेतमाल विकण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता आम्ही खासगी व्यापारी किंवा संस्थांना शेतमाल विकू शकतो. ते आमच्यासाठी फायदेशीर ठरतं, असं मनोज यांनी मोदींना सांगितलं.

मोदी सरकारच्या या योजनेचं भाजपाने मोठ्या इव्हेंटमध्ये रुपांतर केल्याचं दिसून आलं. देशभरातील विविध राज्यांत, जिल्ह्यात हा कार्यक्रम लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आला. तसेच, भाजपा पदाधिकाऱ्यांनीही या योजनेतून शेतकऱ्यांचा लाभ होत असल्याचं सांगताना, केंद्र सरकारचे शेती कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच असल्याचं पटवून दिलं. एका कार्यक्रमात दोन हेतू मोदी सरकारने साध्य केले आहेत. या योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात आनंद दिसून आला. पण, ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांना यासंदर्भात तक्रार करुन किंवा माहिती घेऊन लाभ घेता येईल. त्यासाठी खाली दिलेली प्रकिया वाचून ती अवगत करावी लागेल.

■अशी करा तक्रार…

यापूर्वीच्या यादीत आपलं नाव आहे, परंतु अपडेटेड नवीन यादीत आपलं नाव नसेल तर तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबरवर तुमची तक्रार दाखल करु शकता. पीएम किसान हेल्पलाइन नंबर पुढील अंक आहेत – 011-24300606, याशिवाय केंद्र सरकारकडून आणखी काही नंबरही देण्यात आले आहेत. त्यामुळे, आपणास या योजनेतून पैसे मिळाले नसल्यासं तक्रार करता येईल.

पीएम किसान टोल फ्री नंबर- 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन नंबर-155261
पीएम किसान लैंडलाइन नंबर- 011-23381092, 23382401
पीएम किसान हेल्पलाइन- 0120-6025109
ई-मेल आईडी- pmkisan-ict@gov.in
योजनेतील लाभार्थ्यांची यादी येथे पाहावी –
सर्वात प्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यासाठी खाली देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा
https://pmkisan.gov.in
वेबसाईटच्या उजव्या बाजूस ‘Farmers Corner’ च्या खाली तुम्हाला ‘Beneficiary List’ चा पर्याय दिसेल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज खुले होईल, त्यावर राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, तालुका आणि गावं निश्चित करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page