पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शिवसेना शाखेत रक्तदान शिबिर संपन्न..

पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शिवसेना शाखेत रक्तदान शिबिर संपन्न..

आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने आयोजन

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेत आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी ४५ जणांनी रक्तदान केले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, माजी जी.प. अध्यक्ष विकास कुडाळकर, उपसभापती जयभारत पालव, शहर प्रमुख संतोष शिरसाट, पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर , नगरसेविका प्रज्ञा राणे, रुपेश पावसकर, संजय भोगटे, राजू गावंडे, नितीन सावंत, कृष्णा तेली, स्वप्नील शिंदे, बाबी गुरव, गोट्या चव्हाण, साईश घुर्ये, धर्मा सावंत आदी उपस्थित होते.

रक्त संलकन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय रक्तपेढी विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पालव, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी दीपाली माळगावकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता किशोर नांदगावकर,कर्मचारी नितीन गावकर, सुरेश डोंगरे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..