जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश..
कुडाळ, तालुक्यातील जांभवडे या गावातील ग्रामपंचायत सदस्या वेदिका राणे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस मद्धे प्रवेश केला.जांभवडे या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात कुपवडे ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या वेदिका राणे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला, याप्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, प्रदेश संघटक सचिव काका कुडाळकर, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस सरफराज नाईक, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, बाबा मेस्त्री, बंटी परब, काशिनाथ परब, चिंतामणी माडव हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.