भोगवे येथील नवविवाहितेचे गोवा येथे अपघातात निधन..

भोगवे येथील नवविवाहितेचे गोवा येथे अपघातात निधन..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे कोलवेळवाडी येथील नवविवाहिता संचिता सचिन करलकर (वय २३) हिचा वास्को गोवा येथे अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे भोगवे परिसरात शोककळा पसरली आहे.
भोगवे येथील सचिन करलकर यांचा दहा महिन्यांपूर्वी तालुक्यातील गोवरी भगतवाडी येथील तेजस्विता उर्फ श्रद्धा जगन्‍नाथ पाटकर यांच्याशी विवाह झाला होता. गोवा येथे दोघे कामाला असल्याने गुरुवार २४ डिसेंबर रोजी संचिता आपल्या पती सचिन सोबत दुचाकीवरून कामावर जात होती. मात्र वास्को न्यू वाडा येथे दुचाकी आली असता गाडीचा टायर पंक्चर होऊन संचिता मागच्या मागे रस्त्यावर कोसळली. या अपघातात संचिता रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर आपटली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सचिन याने स्थानिकांच्या मदतीने तिला तात्काळ गोवा बांबुळी येथे उपचारासाठी हलविले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. काल शुक्रवार २५ डिसेंबर रोजी तिच्यावर भोगव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात पती, सासु, दीर, भावजय, आई-वडील, बहीण असा परिवार आहे. या दुःखद घटनेमुळे करलकर व पाटकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अभिप्राय द्या..