लोरे नं. 2 येथील शिवसैनिक सुरेंद्र रावराणे यांचा भाजपात प्रवेश..

लोरे नं. 2 येथील शिवसैनिक सुरेंद्र रावराणे यांचा भाजपात प्रवेश..

वैभववाडी/-

आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोरे नं 2 येथील शिवसैनिक सुरेंद्र वसंत रावराणे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे .सुरेंद्रराव यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांचे वैभववाडी भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. वैभववाडी तालुक्यात आमदार नितेश राणे यांनी पक्षप्रवेश मालिका सुरू ठेवली आहे.ज्येष्ठ शिवसैनिक असलेले सुरेंद्र रावराणे यांनी शिवसेनेच्या कारभाराला कंटाळून कमळ हाती घेतले आहे. लोरे ग्रामपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर सुरेंद्र रावराणे यांचा प्रवेश शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सन 1990 पासून सुरेंद्र रावराणे हे शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. गावात तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. तसेच देवस्थान समिती अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. लोरे गावात त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या प्रवेशामुळे लोरे गावात भाजप अधिक भक्कम होणार आहे. कणकवली येथे त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, शक्ती केंद्रप्रमुख रितेश सुतार, सोसायटी चेअरमन प्रमोद पांचाळ, छोटू रावराणे, संजय रावराणे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..