युवासिंधु फाउंडेशन सिंधुदुर्ग चा स्तुत्य उपक्रम

युवासिंधु फाउंडेशन सिंधुदुर्ग चा स्तुत्य उपक्रम

 

वेंगुर्ला
युवासिंधु फाउंडेशन सिंधुदुर्गने स्तुत्य उपक्रम राबविला.
ख्रिसमसचे औचित्य साधून आज २५ डिसेंबर रोजी माणगाव वाडोस येथे
स्वप्ननगरीला भेट दिली व युवासिंधु फाऊंडेशनचे सदस्य कु. मुन्ना आजगांवकर याचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.
ख्रिसमसचे औचित्य साधून स्वप्ननगरीमध्ये वाढदिवस साजरा करत स्वप्ननगरी मधील लोकांना सांताच्या मार्फत कपडे, शेतीसाठी उपयुक्त सामान, चॉकलेटस,लाडू,केक याचे वाटप करून आनंदाचे काही क्षण त्यांच्यासमवेत साजरे केले.स्वावलंबी असणं म्हणजे नेमकं काय असत या प्रश्नाच उत्तर स्वप्ननगरी मधील लोकांना भेटल्यावर कळालं.
अपंगत्व असणं म्हणजे आयुष्य संपलं अशी हार न मानता जिद्दीने काहीतरी प्राप्त करणं ही उमेद मनाशी बाळगून सुंदर आयुष्य जगता येतं,ही सुंदर शिकवण युवासिंधु फाऊंडेशनच्या सदस्यांना शिकवून गेली,अशी भावना यावेळी युवासिंधु फाउंडेशनच्या सदस्यांनी अभिमानाने व्यक्त केली.तसेच सर्वधर्म समभाव हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला,असेही मत त्यांनी व्यक्त केले.

अभिप्राय द्या..