श्री लक्ष्मीनारायण मंदिरातील पुरातन कोरीवकाम ,दिपमाळ, निसर्गरम्य तलाव वालावलचा नदी किनारा अशा सौंदर्याची सर्वांनाच भुरळ पडते .या निसर्ग सौंदर्याच्या ओढीनेच मिलिंद गुणाजी यांनी वालावल तीर्थक्षेत्राला भेट दिली .सर्व पुरातन वास्तूची जपणूक करून जे मंदिराला आधुनिक रूप दिलेले आहे. मंदिर परिसरातील स्वच्छता. केलेले सर्व रंगकाम आणि होणाऱ्या विविध सुधारणा पाहून मंदिराच्या स्थानिक कमिटीच्या कामाचे ही कौतुक केले .मिलिंद गुणाजी यांची विविध परी सरातील भ्रमंती विविध गड-किल्ल्यांची पायीवारी केली असल्यामुळे या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी काही सूचनाही केल्या. पर्यटन म्हणून विकसित होणाऱ्या वालावल परिसरावर डाक्युमेंटरी करण्याचे कबूल केले श्री देव लक्ष्मी नारायण देवस्थान स्थानिक सल्लागार समितीच्या वतीने श्री संदिप साळसकर आणि श्री गुरू देसाई यांनी शाल श्रीफळ आणि ऐतिहासिक पुस्तकाची प्रत देऊन श्री गुणाजी आणि त्यांच्यासोबत असलेल्या पाटील कुटुंबीयांचे ही सन्मान सत्कार केला. यावेळी श्री व्यवस्थापक महेश हळदणकर तसेच श्री दत्ता कद्रेकर उपस्थित होते शेवटी श्री मिलिंद गुणाजी यांनी आपल्या टीमसह या क्षेत्राला पुन्हा भेट देण्याचे कबूल केले.