उद्द्या २६ डिसेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत कुडाळ शिवसेना शाखेत

उद्द्या २६ डिसेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत कुडाळ शिवसेना शाखेत

 

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उद्या शनिवार दिनाक २६ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५ वा. कुडाळ शिवसेना शाखेत उपस्थित राहणार आहेत.याप्रसंगी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार असून शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी हार,पुष्पगुच्छ न आणता,गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शुभेच्छा द्याव्यात.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत यांचे समर्थक,तसेच शिवसैनिक कुडाळ,मालवण,वेंगुर्ला ,सावंतवाडी तालुक्यात आहेत,तसेच आपल्या च|हत्यांच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत कुडाळ शिवसेना शाखेत उपस्थित राहणार आहेत,अशी माहिती शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..