निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कुडाळ तालुक्यांतील आकेरी येथील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक संपन्न..

निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कुडाळ तालुक्यांतील आकेरी येथील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक संपन्न..

 

 

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असता सर्व पक्षांनी आपल्या ताब्यात ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी येईल याची मोर्चा बांधणी सुरू आहे. त्यातच काल रात्री कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मोर्चेबांधणीच्या दृष्टीने मिटिंग संपन्न झाली.राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत काबित करण्यासाठी कंबर कसली आहे.पक्षाचे पदाधिकारी पक्षबांधणीसाठी ग्रामपंचायतीवर सत्ताकाबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.

आमदार वैभव नाईक यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर कुडाळ तालुक्यांतील आकेरी येथील शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक श्री.अमरसेन सावंत आणि बबन बोभाटे,युवा नेते रुपेश पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी ग्रामपंचायत निवडणूकीविषयी चर्चा करण्यात आली.आकेरी ग्रामपंचायतवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला. श्री.रुपेश पावसकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, जि.प.सदस्य राजू कविटकर, राजू गवंडे आणि शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..