वेंगुर्ला /-
नाशिक येथे झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग महिला क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक मिळविला.त्याबद्दल सध्या शिरोडास्थित, संघाची कर्णधार कु . राधिका घाटये हिचा शिरोडा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पूर्ण संघाचे व प्रशिक्षक , मार्गदर्शक यांचे ग्रामपंचायती लच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.यावेळी शिरोडा ग्रा.प.सरपंच मनोज उगवेकर, उपसरपंच रवी पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी सुनील चव्हाण, ग्रा.पं. सदस्या विशाखा परब, समृद्धी धानजी, प्राची नाईक,वेदिका शेट्ये,स्वरूपा गावडे,दिलीप गावडे,कौशिक परब,संजय फोडनाईक, गुणाजी आमरे, निलेश मयेकर आदी उपस्थित होते.