बाळासाहेब ठाकरे यांचे नाव खासगी विमानतळ प्रकल्पला देऊ नये.;मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी..

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव खासगी विमानतळ प्रकल्पला देऊ नये.;मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी..

 

बाळासाहेबांचे नाव मुंबई -गोवा राज्य महामार्गाला द्या..

कणकवली /-

शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट असे नाव अख्या जगावर कोरले आहे. त्यांचे नाव एका खासगी विमानतळ असलेल्या चिपी विमानतळाला देऊ नये. असे मत व्यक्त करत; मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला त्यांचे नाव द्यावे ,अशी मागणी मनसेची आहे. मी आजही बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे.आता हे उपरे सत्ताधारी व विरोधक विमानतळ नामांतर श्रेयवाद करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे.यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश नेरकर आदी उपस्थित होते.राणे व त्यांच्या पुत्रांनी सात्यतांनी टीका बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केली.शिवसेना संपविण्याची भाषा केली.त्यावेळी जिल्ह्यात आम्ही राणेंशी लढलो, आम्ही राहिलो नसतो तर आताची शिवसेना राहिली नसती.आता पुतण्या मावशीच्या प्रेमाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आग्रह करत आहे.बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी भाषा केली.काही वक्तव्य केल्याने त्याची माफी राणेंना मागावी लागली.राणे कुटुंबातील लोकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या वर बोलायचा अधिकार नसल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला आहे.

अभिप्राय द्या..