एमआयडीसी वाळूज परिसरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर बळजबरी अत्याचार करून तिला लग्न करण्यास भाग पाडणाऱ्या तसेच तिचा धर्म बदलून तिला दुसऱ्या व्यक्तीसोंबत शरीरसंबंध करण्यास बळजबरी केल्याप्रकरणात आरोपी हुस्ना बेगम मोहम्मद इब्राहिम हिने सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायधीश एस. एस. भिष्मा यांनी फेटाळला. गुन्ह्यात यापूर्वी आरोपी मोहम्मद उमर जावेद मोहम्मद (२५, रा. नॅशनल कॉलनी) व मोहम्मद इस्माईल मोहम्मद अश्रफ (४०, रा. मकसुद कॉलनी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पीडित तरुणी एमआयडीसी वाळूज परिसरातील बजाजनगर येथील रहिवासी असून, तिचे प्रेमसंबंध मोहम्मद उमर या तरुणासोबत जुळले होते. मोहम्मद उमर याने पीडितेवर जून २०१९मध्ये तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी मोहम्मदसह तिघांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकला. त्यामुळे पीडितेने सातारा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मोहम्मद उमर याचा मामा मोहम्मद इब्राहीम, मोहम्मद अहेमद, आई रिहाना बानो, मामी हुस्ना बेगम यानी पीडितेला आणि तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत तसेच पीडितेचा लैंगिक अत्याचार करतावेळीचा व्हिडिओ दाखवून तिचे धर्मांतर करून मोहम्मद उमर याच्यासोबत लग्न करावयास भाग पाडले. पीडितेचा विवाह झाल्यानंतर तिचा पती मोहम्मद उमर, मामा मोहम्मद इब्राहीम, मामी हुस्ना बानो हे पीडितेला वेगवेगळ्या इसमासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होते. पीडितेने त्यास विरोध केल्यास तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात येत होती.

पीडित तरुणी तीन महिन्याची गर्भवती असताना तिच्या पतीने तिला ३० सप्टेंबर रोजी बेदम मारहाण केली. या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जावरील सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्‍ता अरविंद बागुल यांनी आरोपीला जामीन दिल्यास ती पुरावा नष्ट करून साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. आरोपी हुस्ना बानोविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून देखील ती अद‍्याप पसार असल्याने तिला जामीन देण्यात येवू नये अशी विनंती न्यायालयाकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page