पोलीस खात्यात भरती होऊन पोलीस अधिकारी बना ! -सतीश सावंत

पोलीस खात्यात भरती होऊन पोलीस अधिकारी बना ! -सतीश सावंत

– सांगूळवाडी येथे मोफत भरती पूर्व प्रशिक्षणार्थीना सतीश यांनी दिले किट-
वैभववाडी :सांगूळवाडी सारख्या ग्रामीण भागात सेवा निवृत्त पोलीस हवालदार रविंद्र रावराणे यांनी भरती पूर्ण प्रशिक्षण मोफत सुरू केले आहे. याचा मुख्य हेतू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी पोलीस खात्यात भरती होऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी बनावे, त्याच प्रमाणे रावराणे यांनी बाळगलेले स्वप्न साकार करावे असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.
श्री विठू महाकाली पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण (ॲकॅडमी)सांगुळवाडी येथील प्रशिक्षनार्थ्यांना मोफत किट वाटप करतांना शिवसेना नेते तथा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, शिवसेना नेते संदेश सावंत पटेल, नावळे गावचे माजी सरपंच संभाजी रावराणे, उपळे माजी सरपंच प्रेमानंद पालांडे,तुकाराम उर्फ बाळा राणे, सत्यवान सुतार ,महादेव काटे, संतोष रावराणे ,पालक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
यावेळी प्रशिक्षणार्थीना शूज,ट्रॅक, टी शर्ट व पौष्टीक आहाराचे मोफत वाटप करण्यात आले.

अभिप्राय द्या..