हत्या, आत्महत्येनं मुंबई हादरली, भिवंडीत गळा चिरला, वसईत एकाच कुटुंबात आत्महत्या

हत्या, आत्महत्येनं मुंबई हादरली, भिवंडीत गळा चिरला, वसईत एकाच कुटुंबात आत्महत्या

मुंबई : हत्या आणि आत्महत्येच्या घटनांनी मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे . आज मुंबईतील भिवंडीत एका 46 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. तर नालासोपाऱ्यात मालगाडी खाली येऊन एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये 10 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे..

नालासोपाऱ्यांत तिघांची आत्महत्या
पहिल्या घटनेत नालासोपाऱ्यात मालगाडीखाली येऊन एकाच कुटुंबातील 3 जणांनी आत्महत्या केली आहे. या 3 जणांपैकी 10 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. जखमी चिमुकलीला जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये आई, मुलगा आणि 10 वर्षीय मुलीचा समावेश होता. यांची अद्याप ओळख पटलेली नाही.

नालासोपारा आणि वसई दरम्यान वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडी खाली येऊन या तिघांनी आपली जीवन यात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी कशीबशी बचावली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून लोहमार्ग पोलीस याचा शोध घेत आहेत.

भिवंडीत महिलेचा खून
भिवंडी शहरात एका 46 वर्षीय महिलेची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. हाफसन आळी येथील ही घटना आहे. पूजा लक्ष्मण बुरला असे हत्या झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी या विधवा महिलेसोबत तिचा मुलगाही होता. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली आणि मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. महिलेचा खून कोणी केला, का केला, याचा तपास पोलीस करत आहे.

अभिप्राय द्या..