मुंबई /-

मुंबईत काम करणार्‍या परराज्यातील नागरिकांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे.अनलॉकनंतर आर्थिक राजधानी मुंबईत जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे 25 लाख प्रवासी विशेष रेल्वे गाड्यांमधून परतल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेने दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे परराज्यातील अनेक कामगार, मजुर कुटुंबीयांसह आपल्या गावी गेले होते. त्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या. जून महिन्यापासून टाळेबंदी शिथिल होण्यास सुरुवात झाली. मध्य रेल्वेच्या विशेष गाडयांमधून मुंबई महानगरात सर्वाधिक प्रवासी परतले आहेत. मध्य रेल्वेने सीएसएमटी, एलटीटी, ठाणे, कल्याण येथून उत्तरेकडे व दक्षिणेकडे जाण्यासाठी 15 विशेष गाडया सोडल्या. तेवढयाच गाडया मुंबईत येत आहेत. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत एकू ण 16 लाख 50 हजार जण दाखल झाल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page