अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन महसूल प्रशासनाने डंपर पकडले.;

अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन महसूल प्रशासनाने डंपर पकडले.;

मालवण,

हडी-मालवण मार्गावर विनापास अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन डंपर काल रात्री महसूल प्रशासनाने पकडले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.अनधिकृत वाळू वाहतूकीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने तहसीलदारांच्या आदेशानुसार तोंडवळी-हडी मार्गा दरम्यान काल रात्री पोलिस बंदोबस्तात कारवाई तपासणी मोहीम सुरू होती. यावेळी विनापास अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणारे दोन डंपर ताब्यात घेण्यात आले. हे दोन्ही डंपर तहसील कार्यालयात आणण्यात आले. अशी माहिती तलाठी व्ही. व्ही. कंठाळे यांनी दिली.दोन्ही डंपरचा अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार अजय पाटणे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..