कणकवली /-

भाजपा जिल्हा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी तळेरे येथील कूूूषी क्षेत्रातील गाढे अभ्यासक राजेश माळवदे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सूचनेनुसार किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी निवड केली जाहीर केली माळवदे यांचे सेंद्रिय कृषीक्षेत्रात फारमोठे योगदान आहे.कृष्णा अँग्री बिझनेस कंपनीचे महाराष्ट्र प्रदेशप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.त्यामध्ये त्यांंनी उत्त्कृष्ट कामगिरी बजावली असून यावर्षीचा कूूषीपंडीत हा बहुुमान मिळविला आहे.त्याचबरोबर महिला बचत गटातील महिलांंना सबलीकरणाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बहमोल मार्गदर्शन करतात.तरुण होतकरू युवकांना करिअरविषयक मार्गदर्शन करतात.तसेच सनस्टार ग्रुप ऑफ कंपनीज या आयुर्वेदिक कंपनीचे डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत.१९९० पासून कट्टर राणे समर्थक त्यानंतर राणेसोबत भाजपात दाखल झाले.माळवदे यांच्या कृषिक्षेत्रातील भरीव योगदानाची दखल लक्षात घेऊन भाजपा किसान मोर्चाच्या सरचिटणीसपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.राजेश माळवदे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातूूून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page