विशेष..

        जगभरात मृत्यूच्या वीस कारणांपैकी महत्त्वाचे एक कारण म्हणजे आत्महत्या. जगभरात प्रति 40 सेंकदाला एका व्यक्तीची आत्महत्या होत असल्याची निरीक्षणे नोंदविण्यात आली आहेत. आज 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस. याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. दिवसातील २५ आत्महत्यांच्या मागे केवळ लक्ष वेधण्यासाठी केलेला प्रयत्न दिसून येतात. विकृती, मानसिक ताण, दबाव टाकण्यासाठी फक्त प्रयत्न केल्याचे दिसते. मात्र, याचा पुढे विस्फोट होऊ शकतो, असे मानसोपचार तज्ज्ञ मंडळींनी केलेल्या अभ्यासातून निष्कर्ष समोर आलेले आहेत. *आत्महत्येची लक्षणे :* ▪️ मृत्यू किंवा आत्महत्येविषयी विचार करणे किंवा लिहिणे. ▪️ निराश, हतबलता अथवा किंमत नसल्याची भावना बोलून दाखविणे. ▪️ चिंताग्रस्त, संतापलेपणा, सत्तत बदलणारा मूड किंवा बेफिकिरी ▪️ निरोपाची भाषा, अमली पदार्थाचे सेवन. *आत्महत्या प्रतिबंधासाठी :* ▪️ मानसिक दडपण आल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ▪️ जवळच्या व्यक्तीशी कायम मोकळेपणाचा संवाद ठेवा. ▪️ आभासी दुनियेपेक्षा प्रत्यक्षात माणसांच्या सहवासात राहा. ▪️ मानसिक आजारांवर सकारात्मक चर्चा घडावी. *कोणती काळजी घ्यावी? :* ▪️ तणावग्रस्त व्यक्तीचे म्हणणे आपुलकीने ऐकावे. ▪️ मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर समुपदेशक यांची मदत घ्यावी. ▪️ आत्महत्या रोखण्यासाठी कार्यरत हेल्पलाईनवर संपर्क करावा. आत्महत्येचा विचार म्हणजे, तात्पुरती मानसिक अवस्था असून त्यावेळी व्यक्तीला आधाराची सक्त गरज असते. त्यामुळे कोणी आत्महत्येबाबत काही बोलून दाखवत असेल, तर त्याच्यावर मानसोपचार करण्यास सांगा. त्याला मोकळेपणाने बोलण्यास तयार करायला हवे. आत्महत्येचा विचार करणारी व्यक्ती ही प्रचंड नैराश्यात असते. निराशेची भावना बळावली की व्यक्ती स्वत:ला इजा करून घेण्याची शक्यता असते, तर काहीवेळा आत्महत्येचे पाऊल उचलू शकते. राष्ट्रीय गुन्हेगारी वार्षिक अहवाल २०१५ नुसार भारतात आत्महत्या समस्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक येतो. काही संस्था आत्महत्येस प्रतिबंध घालण्यासाठी कार्यरत आहेत. यामध्ये मागील चौदा वर्षांमध्ये संस्थेने हेल्पलाईनद्वारे ‘अ‍ॅक्टिव्ह लिसनर’च्या भूमिकेतून राज्यासह बाहेरील राज्यांमधील जवळपास २५ हजार लोकांना आत्महत्येपासून परावृत्त केले आहे.आत्महत्येच्या विचारात अडकलेल्या माणसांना मानसिक आधार देण्याचे काम ही संस्था करीत असून, निराशेच्या गर्तेत ओढल्या गेलेल्यांसाठी ही संस्था आशेचा किरण बनली आहे. संस्थेचे स्वयंसेवक ‘आत्महत्या प्रतिबंधा’साठी काम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page