दरड कोसळल्याने असनिये – घारपी रस्ता बंद तर कणेवाडीत दरडीची माती घरात घुसल्याने नुकसान
बुधवारी संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे असनिये येथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत यात असनिये घारपी मुख्य मार्गावर मातीचा भला मोठा ढिगारा रस्त्यावर आल्यामुळे असनिये घारपी मार्ग बंद होता तर कणेवाडी येथील येथील श्री विलास ठिकार यांच्या घरा शेजारी असलेली दरड कोसळून मातीचा ढिगारा त्यांच्या घरात शिरल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर पावसासोबत वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत खांब उन्मळून पडण्याच्या देखील घटना घडल्या आहेत
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे असनीये कोणेवाडी येथे भू उत्खनन होऊन मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते होते त्यामुळे संपूर्ण कणेवाडी क्षेत्र बाधित म्हणून घोषित करुन आरहिवाशांना काही दिवस स्थलांतरित करण्यात आले होते त्यामुळे पावसाळ्यात वारंवार अशा प्रकारच्या दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये मात्र भीतीचे वातावरण असून प्रशासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे